Share

वंचित आणि एमआयएमची आघाडी तुटल्यामुळे होणार मत विभाजन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम मिळवलेले मताधिक्य हे सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. औरंगाबाद चा निकाल आणि राज्यात वंचित मिळवलेले 72 लाख मते विधानसभेसाठी ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एमआयएम व वंचित यांची आघाडी तुटल्यामुळे यांच्यामागे असलेला मतदारात मत विभाजन होण्याची शक्यताही राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचे एकत्र होती याचा परिणाम औरंगाबादच्या जागेवर दिसून आला एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील 5000 मते घेऊन निवडून आले. एमआयएम आणि वंचित एकत्र असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणचे गणिते बदलली. याचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. तर भाजप-शिवसेनेला याचा मोठा फायदा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित एकत्र राहतील असे वाटले होते. मात्र जागावाटपावरून या दोघांचे बिनसले. एमआयएमने राज्यातील दहा ते बारा जागांसाठीच्या उमेदवारी जाहीर केल्या.

वंचित तर्फे ही राज्यातील विविध जागा जाहीर करण्यात आल्या आहेत . यामुळे एकत्र असणारे आता एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत असणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर मत विभाजन होऊन याचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178240351007473664?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178240459551862785?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!