Share

भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पतीवर फसवणूकीचा गुन्हा नोंदवून चौकशी करा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केजयेथील भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीसह इतर गुन्हे नोंद करुन चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश केज येथील न्यायालयाने बुधवारी (ता. ११) दिले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूकीसाठी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याची फिर्याद गणपती कांबळे यांनी न्यायालयात केली होती.

भाजप आमदार संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहूरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर गैरव्यवहारात आमदार श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला.

सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ आश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथ पत्र जोडून ॲड. संतोष मुंडे यांच्या मार्फत तक्रार दिली होती. यावरुन प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती थोरात यांनी आमदार संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!