🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली. मुंबईकर रोहित शर्माने या सामन्यात १४४ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.
रोहित शर्माचं हे वनडे क्रिकेटमधलं २३वं शतक होतं. याचबरोबर रोहित शर्माने सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं आहे. वनडेमध्ये सौरव गांगुलीने २२ शतकं केली होती. रोहितने गांगुलीसोबतच श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचंही २२ शतकांचं रेकॉर्ड मोडलं. सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत आता रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
दरम्यान,वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ शतकं केली आहेत, तर या यादीमध्ये विराट कोहली ४१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
