टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिणची जागा तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढावा अस खुद्द कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी सांगितले, हे ऐकून मला धक्काच बसला असा खुलासा कॉंग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मात्र, आपल्या राजकीय भूमिकेवर निर्णय अजूनही झालेला नसल्याचे विखे पाटीलांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निर्णय घेईल असे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी राधाकृष्ण विखे यांची भाजप किंवा शिवसेना वा इतर कोणत्याही पक्षात जाण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र पक्षाकडून जर नोटीस आली तर त्यावेळी योग्य भूमिका घेतली जाईल अस सूचक विधान सुधा विखेंनी केल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
