Share

‘कॉंग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर ठीक नाही तर ते अपक्ष लढतील’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्ष़ाने सांगलीतून बंधू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर ठीक नाही तर ते अपक्ष लढतील, असेही त्यांनी जाहीर केले.

“मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. वसंतदादांचे नाव हाच माझा पक्ष आहे”, असे सांगत प्रतीक पाटीलांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे.

दरम्यान, काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यामुळेच नाराज प्रतीक पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.प्रतीक पाटील यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!