Share

राजीव गांधींची हत्या देखील अपघात होती का ? भाजपने डागली कॉंग्रेसवर तोफ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं.’राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की ती देखील अपघात होती का ? असा प्रश्न उपस्थित करत सिंह यांनी कॉंग्रेस आणि दिग्विजय सिंह यांच्यावर हल्ला चढविला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसकडून शहिदांचा अपमान करण्याचा सपाटा सुरूच आहे. आधी खा.सिद्धू नंतर कपिल सिब्बल आणि आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान करत अकलेचे तारे तोडले आहेत. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्यानं आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं भाजपानं दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली.

मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,’ असं सिंह म्हणाले. ‘राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की ती देखील अपघात होती का ?राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!