Share

India vs Shrilanka: धवनच्या १९० धावांच्या जोरावर भारताने उभारला ३९९ धावांचा डोंगर !

Published On: 

🕒 1 min read

चेतेश्वर पुजाऱ्याने ही झळकावले कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतकात !

श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. अभिनव मुकुंदाला दुखापतग्रस्त के. एल राहुलच्या जागी संघात स्थान देण्यात आले, तर आयपीएल स्टार हार्दिक पंड्याने या सामन्यात भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू बनला आहे.

नाणेफेक जिंकल्या नंतर भारताला पहिला झटका ८व्या षटकात बसला तो म्हणजे संघात कमबॅक करत असलेल्या अभिनव मुकुंदाच्या विकेटने. मुकुंदने २६ चेंडूत १२ धावा केल्या आणि त्याने प्रदीपच्या गोलंदाजीवर डिकवेलाला झेल देऊन आपली विकेट गमावली.

त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी गब्बर अर्थात शिखर धवन आणि नवीन वॉल अर्थात चेतेश्वर पुजारामध्ये २५३ धावांची भागीदारी झाली. धवनचे द्विशतक १० धावांनी हुकले तर धवन बाद झाल्यानंतर पुजाऱ्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११वे शतक पूर्ण केले.

विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो ८ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज प्रदीपनेच तिन्ही विकेट्स घेतल्या.

त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने चिकाटीने किल्ला लढवून पुजारा बरोबर १०० धावांची भागीदारी केली आणि दिवस अखेर दोघेही नाबाद राहिले.

संक्षिप्त धावफलक:

भारत ३९९-३: धवन १९०, मुकुंद १२, विराट ३,पुजारा खेळत आहे १४४*, रहाणे खेळत आहे ३९*, नुवान प्रदीप १८षटके ३ विकेट्स

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!