बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता घणाघात केला आहे.
बीडमध्ये अनेक अवैध धंदे वाढत आहेत. खून, दरोडे आणि महिला अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. तरी देखील जिल्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, असा आरोप पंकजा यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील बोकाळलेला माफिया राज बंद करावा, पण या माफिया राजला सत्तेत बसलेल्या लोकांचा पाठिंबा असल्याची टीका देखील त्यांनी केली.
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडे, मारामारी याबरोबरच महिलांवरील अत्याचार, जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतूक आदींनी डोके वर काढले आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असून त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नाही. सत्तेत बसलेल्या लोकांचा याला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याने सर्व सामान्य जनता त्रासली आहे. हा ‘माफिया राज’ बंद करावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
- ‘नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते’
- अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा – नवाब मलिक
- वेळ आली तर कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू; अजित पवार यांची ग्वाही
- नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, रास्ता रोको करत दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

