🕒 1 min read
आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत आज (सोमवार दि.१९ जुलै) रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने पायी वारीस परवानगी नसून संतांच्या पादुका आणि मोजके वारकरी हे शिवशाहीने पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
ज्या बसमधून पादुका नेल्या जात आहेत त्यांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मागील दिवसांमध्ये मंदिर आवारातच वारीतील सर्व परंपरा आणि विधिवत पूजा-अर्चा करण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज शिवशाहीबसमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांच्या प्रवासासाठी शिवाजीनगर आगाराला मान मिळाला आहे.
दरम्यान, ज्या बसमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला जाणार आहे त्या गाडीचे सारथ्य करण्याचा मान चालक सोमनाथ होले यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे सोमनाथ हे स्वतः वारकरी आहेत, मागील 22 वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळात सेवा देत आहेत. आणि आज अशाप्रकारे पालखी सोहळ्यात सहभागी होण्याच्या मान मिळाल्यामुळे त्यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. आयुष्य सार्थकी लागल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली असून मागे केलेल्या वारीचे हे पुण्य म्हणून अशा विशेष वारीचे सारथ्य करण्याचा मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- ‘जसा बेस्ट शी.एम तशी बेस्ट महापालिका; सर्वे नंतर सामना म्हणेल आमचीच लाल,’ मनसेचा खोचक टोला
- ओढ विठूरायाची…मानाच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मान संत मुक्ताईचा
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- पृथ्वी शॉचं कौतुक करत शास्त्रींची घेतली फिरकी ; सेहवागचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
