कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती.
दरम्यान, संभाजीराजेंनी आज मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज समन्वयकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील दिली. या मोर्चाची टॅगलाईन ‘आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय’ अशी असेल. ’36 जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका,’ असा इशारा संभाजीराजेंनी दिली आहे.
पुढे त्यांनी मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही, अशी खंत देखील बोलून दाखवली. ‘मला समजून घ्या मी जी भूमिका घेईन ती समाजाच्या हिताची असेल. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी चांगलं जमतं तसंच फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही जमतं,’ असं देखील ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपने खुर्चीसाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप केले – नाना पटोले
- १० मिनिटांच्या लॉटरीसाठी १ तास ३४ मिनिटांचा टाईमपास; म्हाडाच्या घरांची लॉटरी लागली की, नाही समजलेही नाही!
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- ‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू, राहुल गांधींचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
