🕒 1 min read
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, खा. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आपली स्पष्ट केली.
मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं.
दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपने देखील अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर माझा विश्वास आहे. ते आता स्वत:हूनच राजीनामा देतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- धनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ
- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ठरणार धनंजय मुंडे यांचे भवितव्य ?
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
