Share

NCP । वादग्रस्त विधानानंतर सत्तारांच्या घरावर दगडफेक; NCP कार्यकर्ते आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

NCP । मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असल्याचं दिसतंय.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी अब्दूल सत्तार जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बंगल्याबाहेर हटणार नाहीत, असा पवित्रा घेतला.

दरम्यान, महिलांविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढून त्यांचा सामाजिक दर्जा व कर्तुत्व हनन करणे हा या सरकारचा मुख्य अजेंडा आहे असे मागील एक दोन घटनांवरून स्पष्ट होत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट अमोल मातेले यांनी केला. तरी या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, ई-मेल द्वारे पत्र पाठवून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. अब्दुल सत्तारांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य करण्यास नकार दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!