Share

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने देखील घेतला ‘हा’ निर्णय; १२७ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच खंड

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्यात कोरोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मागील चार महिन्यांपासून सण उत्सव घरीच साजरे करावे लागले आहेत. आता आपला गणेशोत्सव देखील त्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सवर मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील दगडूशेठ गणपती उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दरवर्षी दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या 127 वर्षांची ही परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे देखील यावी सांगण्यात आले.

कोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश

या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या ‘या’ माजी राष्ट्रपतींनाही झाला कोरोना,प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा

तर,  गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार पेठ चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये आणि परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जात आहेत.

तहसीलदारांच्या पतीपासून मला वाचवा, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांकडे धाव

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!