Share

रेकॉर्डवीर कोहली : टी-20 मध्ये महेंद्रसिंग धोनीची बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकाविरुद्धचा दुसरा टी-20 सामन्यात 16 चेंडूत 24 धावा करत, विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.विराटने आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2657 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, विराट कोहली आणि रोहित शर्मा संयुक्तपणे टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहितने 2633 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा भाग नाही. त्यामुळे विराटने त्याला मागे टाकणे निश्चित होते. रोहितला विश्रांती दिल्यानंतर निवड समितीने सलामीची जबाबदारी या मालिकेत दुखापतीतून परतलेल्या शिखर धवनला दिली आहे. या मालिकेत धवन हे के.एल. राहुलसह संघाचे सलामीची जबाबदारी सांभाळत आहेत.

इतकेच नव्हे तर कर्णधार म्हणून कोहली हा सर्वात वेगवान 1000 टी-20 धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्यू प्लेसीचा विश्वविक्रम मोडला. प्लेसीने कर्णधार म्हणून 31 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या, तर कोहलीने केवळ 30 डावांमध्ये हा आकडा पूर्ण केला. कर्णधार म्हणून 1000 टी -20 धावा करणारा कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार आहे. त्याआधी महेंद्रसिंग धोनीने 62 सामन्यांत 1112 धावा केल्या आहेत.

अलीकडील सामन्यांत पहायचे तर ,कोहली टी -20 क्रिकेटमध्ये अतुलनीय कामगिरी बजावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वाधिक 183 धावा केल्या. पहिल्या टी-20 मध्ये त्याने फक्त 50 चेंडूंत 94 धावांची जबरदस्त खेळी खेळली. यानंतर मालिकेच्या तिसऱ्याआणि अंतिम टी -20 मध्ये त्याने 29 चेंडूंत 70 धावा केल्या होत्या. रोहितची फलंदाजी त्या मालिकेत काम करू शकली नाही. यामुळे विराटने सहज त्याची बरोबरी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!