🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. जीओने सोमवारी (ता. २१ ) तीन नवीन ऑल इन वन प्लॅन लाँच केले असून यामध्ये युजर्सना आधीपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओने तीन नवीन प्लॅन सुरू केले आहेत. यामध्ये २२२, ३३३, ४४४ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
पहिल्या सर्वात स्वस्त असलेल्या २२२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज २ जीबी डेटा आणि जिओ टू जिओ नेटवर्क अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर जिओवरून इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट मिळतील. दुसऱ्या ३३३ रुपयांच्या ऑल इन वन प्लॅनमध्ये २२२ रुपयांच्या प्लॅनमध्ये रुपयांत मिळतात. त्यामध्ये एक महिन्याऐवजी दोन महिने मुदत मिळेल. तर ४४४ रुपयांच्या प्लॅनवर युजर्सला तीन महिन्याची मुदत मिळेल.
तीनपैकी कोणताही रिचार्ज मारल्यानंतर त्याची मुदत वाढवण्यासाठी १११ रुपयांचा रिचार्ज केल्यास एक महिना मुदतवाढ मिळेल. नवीन प्लॅन हा जुन्या प्लॅनच्या तुलनेने स्वस्त आहे. सध्या २ जीबी डेटाचा तीन महिन्यासाठीचा प्लॅन ४४८ रुपये आहे. त्याऐवजी ४४४ रुपयात इतर नेटवर्कवर १००० मिनिट टॉक टाइम मिळणार आहे. तर २ महिन्यासाठी याआधी ३९६ रुपयांचा प्लॅन होता त्याच्या इतकाच फायदा २२२ रुपयांत मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1186913896457625600?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186914171822063616?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
