Share

Nilesh Rane | “शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; सीमावादावरून निलेश राणेंची सडकून टीका 

Published On: 

🕒 1 min read

Nilesh Rane | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले असल्याचं म्हंटल. यावर निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधलाय.

 

“शरद पवारांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रकरणात १९८६ ला पोलिसांकडून मार खाल्ला, याचा पुरावा कोणीतरी मला पाठवा. मला पुरावा सापडत नाही”, असं ट्विट करत निलेश राणेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार म्हणाले, “राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरु आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले. दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री यानी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही.”

त्याचबरोबर “उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे की भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटकला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!