🕒 1 min read
हैदराबाद : दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने यावर्षी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. लायगर या चित्रपटामुळे विजय देवरकोंडाला ईडीने धारेवर धरलं आहे. विजयला लायगर चित्रपटाच्या फीडिंगवरून ईडी (ED) चौकशीला सामोरे जावे लागले. चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्मिती चार्मी कौर यांचीही या प्रकरणी चौकशी झाली. या चौकशीसाठी विजय हैदराबाद येथील एजन्सीच्या प्रादेशिक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होता.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘लायगर’ या चित्रपटाला निधी देण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) चे उल्लंघन करून परदेशातून आणल्याचा आरोप या चित्रपटाच्या टीमवर केला जात आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ईडीने विजयला आपल्यासमोर बसवले होते.
ईडी चौकशी झाल्यानंतर विजयने शांतपणे या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आहे की,”लोकप्रियता असल्यावर काही समस्या आणि दुष्परिणाम होतातच. हा एक जीवनाचा अनुभव आहे. ईडीने मला बोलावल्यावर तिकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. मी तिकडे जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. नंतर त्यांनी मला पुन्हा फोन केला नाही.
विजयच्या आधी 17 नोव्हेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्मिती चार्मी कौर यांचीही चौकशी केली होती. ‘लायग’र हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात हिंदी आणि तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या गुंतवणुकीच्या स्त्रोतांबाबत ईडी चित्रपटाटाशी निगडीत लोकांची चौकशी करत आहे. तब्बल 125 कोटी बजेटमध्ये ‘लायगर’हा चित्रपट बनवण्यात आला होता.
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) यांनी प्रमुख भूमिका निभावलेल्या ‘लायगर’ या चित्रपटाचे बहुतांश चित्रकरण लास वेगसमध्ये झाले होते. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “आता घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात…”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
- Raj Thackeray | राष्ट्रवादी काँग्रेसने जातीय राजकारण सुरू केले ; राज ठाकरेंचा आरोप
- Shoaib Malik | सानियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शोएब करणार ‘या’ पाकिस्तानी एक्ट्रेस सोबत लग्न?
- Basavaraj Bommai | सीमा प्रश्नावरील सुनावणीवर बसवराज बोम्मईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमची बाजू संवैधानिक आणि…”
- Bad Breath | तोंड उघडताच येते दुर्गंधी?, तर करा ‘हे’ सोपे उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
