🕒 1 min read
Kapil Patil । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)आणि संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी एक वक्तव्य केलं आहे. भिंवडीत बागेश्वर धाम सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) म्हणाले, “देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही तर, भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यावर एक दिवस चंद्र दिसेल.”
कपिल पाटील यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कपिल पाटील म्हणाले, “महाराजांनी सनातन धर्माचे महत्व सांगितले आहे. भारत हा सनातन धर्मामुळेच आकारला गेला आहे. पण, मी धर्म किंवा राजकारणाबाबत बोलणार नाही. जातपात, धर्म आणि पंथ यापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वोच्च आहे.”
त्याचबरोबर, “भारतातील नागरिकांना वेळीच जाग आली तर चांगली गोष्ट आहे. मात्र, वेळेत जाग आली नाही तर एक दिवस तिरंगा राष्ट्रध्वजावर चंद्र दिसेल. आपल्या वेळेत जाग आली तर तिरंगा चंद्रावर डौलाने फडकेल,” असंही कपिल पाटील (Kapil Patil) यांनी म्हटलंय.
दरम्यान, महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी सोमवारी केली आहे. ते म्हणाले, पालिकेला निर्देश दिले गेले आहेत, की सेक्शननुसार मतदार याद्या तयार करा. या याद्या तयार झाल्यानंतर प्रभाग रचनेच्या बाहेर काही नावे गेल्याने ती नावे दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागाची तिसऱ्या प्रभागात गेली. त्याच्यामुळे मतदारयादीमध्ये नाव असूनही मतदाराला मतदान करता येणार नाही. आपल्या देशात लोकशाही घटनेप्रमाणे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागामध्ये त्याला मतदान करता आले पाहिजे म्हणून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Politics News | ठाकरे गटाचे आमदार रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात ; मोठ्या खासदाराचा गौप्यस्फोट
- Aditya Thackeray | “आदित्य ठाकरे कोण?, मला माहिती नाहीत”, म्हणणाऱ्या तानाजी सावंताना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- DY Chandrachud | वडिलांनंतर मुलगा न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीशपदी शपथ
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Uddhav Thackeray | “या मंत्र्यांना हाकला, नाहीतर…” – उद्धव ठाकरे सत्तारांवर कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
