🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत अनेक त्वचा (Skin) च्या निगडित समस्या घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जास्त कोरडी व्हायला लागते. त्यामुळे आपण त्वचेची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. कारण हिवाळ्यामध्ये त्वचा ओली ठेवणे खूप आवश्यक असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये अंघोळ केल्यावर त्यावर क्रीम लावली नाही तर लगेच त्वचा कोरडी पडायला लागते. त्यामुळे आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही हिवाळ्यातील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर करू शकता.
हिवाळा (Winter) मध्ये त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा
खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा
हिवाळ्यामध्ये खूप गरम पाण्याने अंघोळ करू नका. कारण त्यामुळे चेहरा अधिक कोरडा दिसायला लागतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये खूप जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यावर चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा निघून जातो. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच गरम पाण्याने अंघोळ करावी.
अंघोळीनंतर त्वचा टॉवेलने घासणे टाळा
हिवाळ्यामध्ये आंघोळीनंतर चेहरा आणि त्वचा टॉवेल घासून पुसू नका. टॉवेलने शरीर घासून पुसल्यामुळे त्यावरील मॉइश्चरायझरचे प्रमाण कमी होते. परिणामी त्वचा अधिक कोरडी व्हायला लागते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी करण्यासाठी हलक्या हाताचा वापर करा.
अंघोळीनंतर मॉइश्चरायझर वापरा
हिवाळ्यामध्ये आंघोळीनंतर त्वचेवर पांढरे डाग उमटायला लागतात. कारण अंघोळीनंतर शरीरातील नैसर्गिक तेल कमी झाल्यामुळे त्वचेवर कोरडेपणाचे डाग दिसायला लागतात. त्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ओलावा टिकून राहण्यासाठी हिवाळ्यामध्ये अंघोळीनंतर त्वचेवर तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.
कोरफडीचे जेल वापरा
हिवाळ्यामध्ये त्याच्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी कोरफड किंवा कोरफडीचे जेल वापरावे. नियमित कोरफडीचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवर ओलावा टिकून राहील आणि त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होईल.
त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये ओठांना देखील कोरडेपणाच्या समस्याला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण त्यांना नेहमी मॉइश्चरायस ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नेहमी सोबत ठेवावे. नियमित लिंबाच्या वापराने थंडीमध्ये तुमची ओठ मऊ आणि मॉइश्चराईज राहतील.
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “टीकेची पातळी घसरत असेल तर…”
- Abdul Sattar vs NCP | “अब्दुल सत्तार भिकाऱ्यांच्या यादीत, जीभ छाटू” ; सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक!
- Rohit Pawar | अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवार आक्रमक; म्हणाले…
- T20 World Cup | तडाखेबाज फलंदाजी करत ‘विराट कोहली’ने पटकावला आणखी एक पुरस्कार
- Nilesh Rane | “काही माणसंच नीच असतात, लायकी असेल तर मुलाला…”, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
