🕒 1 min read
Prasad Lad । मुंबई : ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ 18 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane)आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. वैभव नाईक हे चिंधी चोर तर भास्कर जाधव आयटम गर्ल असल्याची घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
वैभव नाईक यांचं नाव आपण चिंधी चोर आणि भास्कर जाधव यांचं नाव आयटम गर्ल ठेऊया असं ते म्हणाले. निलेश राणे सातत्याने ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यावर टीका करत आहेत. यांच्यावर टीका करुन त्यांचे महत्व वाढवू नका असा सल्ला प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी निलेश राणे यांना दिला आहे.
चित्रपट चालण्यासाठी आयटम सॉंग असतं. तसंच भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची आयटम गर्ल असल्याचं म्हणत प्रसाद लाड यांनी जाधवांवर निशाणा साधला आहे. 10 वर्षात 300 पट वाढू शकतात का? असा सवाल प्रसाद लाड यांनी वैभव नाईक यांना केला आहे. संजय राऊत, नवाब मलिक,अनिल देशमुख आत गेले. ज्या राणे साहेबांना जेवणावरून उठवलं त्या राणे साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहोत असे लाड म्हणाले.
प्रसाद लाड म्हणाले, संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचे नावही घ्यायला नको. मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावे घेऊन आपण त्यांना मोठं करायचं नाही असंही लाड म्हणाले. ऐवढे मोठे नेते होता मग तुम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्री का केले नाही? असा प्रश्न उपस्थित करत प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Patil | चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली पाहिजे; सकल मराठा समाजाची मागणी
- Eknath Khadse | “अर्थमंत्री टाळ्यांवर GST लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत”; एकनाथ खडसेंची तुफान फटकेबाजी
- Health Care Tips | गुळ सेवन केल्याने मिळू शकतात अनेक आरोग्यदायी फायदे
- Nilesh Rane | राणे साहेबांवर बोलला तर तू परत नीट घरी जाणार नाही, निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा
- Nilesh Rane | हा चिखलातला डुक्कर, त्याला चिखलातच लोळवणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

