Share

Chandrashekhar Bawankule | “आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिलं, भविष्यात…”; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम होत चाललं आहे. आगामी निवडणुकांच्या (Election) तायारीला सर्व पक्षनेते लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजप (BJP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून वार केला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखरबावनकुळे (Chandrashekhar Bawankule)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीही 50-55 पेक्षा आमदार निवडून आले नाही. त्यांनी आजपर्यंत तोड, फोडीचे राजकारण केलं. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिलं. मात्र, ते कधीही पंतप्रधान बनू शकत नाहीत, भविष्यात होतील की माहिती नाही, असं म्हणत चंद्रेशखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. बावनकुळे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

तसेच, अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना. परंतू अचानक भाजरने निवडणुकीमधून माघार घेतली. यावरून ठाकरे गट भाजप पक्षावर अनेक टीका, टिपण्णी करत आहे. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार जे बोलले, ती स्क्रिप्ट होती का? शरद पवारांनी महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास याचा दाखला दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला विनंती केली होती. राज ठाकरेंनीही विनंती केली होती. शरद पवारांच्या बोलण्यात भाजपानं उमेदवार मागे घेण्याबाबत विचार करण्याचा संदर्भ होता.
उद्धव ठाकरेंनी तर उलट त्यावर प्रतिक्रियाही दिली होती की शरद पवार योग्य बोलत आहेत, भाजपानं त्यांची संस्कृती पाळायला हवी वगैरे. पण जेव्हा आम्ही संस्कृती पाळली, दिवंगत आमदाराच्या पत्नीला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ते उलट आमच्यावर बोंबा मारत आहेत,असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरे गटावरही हल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!