Share

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा ‘धनुष्यबाण’ गेला, आता ‘मशाल’ ही अडचणीत; काय आहे प्रकरण?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आले असून दोन्ही गटाला पक्षाच नवं नाव आणि चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (Samata Party) दावा ठोकला असून ते आता यासाठी हायकोर्टात जाणार आहेत. यामुळे ठाकरेंसमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.

समता पक्षाने ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्ष उद्या म्हणजेच शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे, पण त्यांना हे चिन्ह देऊ नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पक्षाच्या पाठिंब्याला फटका बसला आहे, असा दावा समता पक्षाकडून करण्यात येत आहे.

समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी चिन्हाच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शनिवारी ते कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत. मशाल हे चिन्ह समता पक्षाला आरक्षित करण्यात आलं आहे, तरीही शिवसेनेला हे चिन्ह कसं दिलं गेलं? असा सवाल उदय मंडल यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

समता पार्टी च्या वतीने या अगोदर निवडणूक आयोगात तक्रार करून मशाल चिन्ह आमच्या पार्टीचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाला आम्ही पक्षाचा पूर्ण खर्च सादर करत आलो असून बिहार विधानसभा पोटनिवडणूकीत दोन जागेवर याच चिन्हावर उमेदवार दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं न ऐकून घेताच ठाकरे गटाला हे चिन्ह दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता हायकोर्टात याबाबत काय निर्णय लागतो. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!