🕒 1 min read
मुंबई : ऋतुजा लटके आज अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर निवडणुक लढणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशातच त्या थोड्या भावूक झाल्या असून त्यांनी त्यांचे दिवंगत पती रमेश लटके यांची आठवण काढली आहे.
ऋतुजा लटके काय म्हणाल्या –
12 वाजेपर्यंत आज उमेदवारी अर्ज भरायचा आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गणपतीच्या पुजेनं करतो. ज्याप्रमाणे रमेश लटके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मालपाडोंगरी येथे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे, त्याचप्रमाणे मी देखील तिथे जाणार आहे, असं म्हणत आजच्या दिवसाची सुरुवातही मी त्याप्रमाणे बाप्पाचं दर्शन घेऊन केली आहे.
ऋतुजा लटके यांनी मतदारांना आवाहन करत रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे, असं लटकेंनी म्हटलं आहे. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे, महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी म्हटलं.
अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या महापालिकेमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या राजीनामावरुन चांगलाच वाद पेटला होता. अशातच त्यांना दिलासा मिळाला असून आज त्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत अशा शब्दात ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासोबत रमेश लटके यांचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal । “मी बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, कारण…”; छगन भुजबळांनी सांगितला जुना किस्सा
- Girish Mahajan | “… ठेव फोन” गिरीश महाजनांचं काॅल रेकाॅर्डिंग होतय व्हायरल
- Sushma Andhare । “माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला?”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली
- Murji Patel | अखेर ठरलं! ‘या’ पक्षाकडून मुरजी पटेल लढणार निवडणुक; आज अर्ज भरणार
- Sushma Andhare । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
