Share

Shivsena । शिंदे गट नवीन शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत; जागा आणि नाव दोन्ही ठरलं

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना भवनाचा वाद मिटवण्यासाठी शिंदे आपलं नविन शिवसेना भवन बांधणार आहे. नविन शिवसेना भवनासाठी शिंदे गटाने पुणे शहराची निवड केली आहे. पुण्यात शिंदे गटाच्या कार्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. सारसबागेसमोरील इमारतीत शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे. सध्या या कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार अशी देखील चर्चा होती.

नवी मुंबईत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील शाखेवरून कोणताही वाद होणार नाही. नविन शिवसेना भवनासाठी शिंदे गटाने पुणे शहराची निवड केली आहे. या कार्यालयात कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठा हॉलदेखील तयार करण्यात येणार आहे. शिवाय कॉन्फरन्स रूम, अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबीन देखील तयार करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कार्यालय 24 तास खुलं असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यभर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालय उभे करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आधी आमदार सदा सरवणकर यांनी मुंबईमध्ये दादर भागात प्रति सेनाभवन उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुण्यात देखील मध्यवर्ती ठिकाणी प्रति शिवसेना भवन उभा करणार असल्याची घोषणा शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केली होती.

पुण्यातील नागरिकांना आणि नेत्यांना काहीही काम असलं तर त्यासाठी मुंबईत वाऱ्या कराव्या लागत होत्या. महापालिकेच्या योजना केंद्र शासनाच्या योजना, महाराष्ट्र शासनाच्या योजना या सगळ्या संदर्भातील काम करण्यासाठी या आधी मुंबईला जावं लागत होतं. या सेनाभवनाचं काम काही प्रमाणात पूर्ण झालं आहे. येत्या डिसेंबरच्या शेवट किंवा नव्या वर्षात या सेनाभवनाचा मोठा उद्घाटन सोहळा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन तारीख निश्चित केली जाणार आहे. उद्घाटनाला शिंदे गटाचे मंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!