🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेतील दोन्ही गटांना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर करायची होती. त्यानूसार दोन्ही पक्षांनी तीन-तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सादर करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होत. मात्र काल निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे.
मात्र यावेळी शिंदे गटाच्या चिन्हाचा निर्णय राखून ठेवला होता. तो आज जाहीर झाला. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्हं मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले असून ढाल-तलवार हे चिन्हं मिळाले आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावर विधान केले आहेत. महाजन यांनी दोन्ही गटाला मिळालेल्या चिन्हावरुन सूचक विधान करत जनता कुणाला कौल देते हे महत्वाचे असल्याचं म्हंटले आहे. ढाल तलवार हे ऐतिहासिक चिन्ह असून शिंदे गटाला चांगले चिन्ह मिळाल्याचे महाजन यांनी सांगितलं आहे. ढाल तलवार कामात येते की मशाल कामात येते हे स्पष्ट होईल असा इशाराही दिलाय. इकडे आग लावायची आहे का? तिकडे आग लावायची? यापेक्षा जनतेचा कौल महत्वाचा असल्याचे म्हणत ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरुन महाजन यांनी ठाकरे गटाला चिमटा काढला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नवीन चिन्ह क्रांती घडवेल असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर नारायण राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. नारायण राणे म्हणाले कि, क्रांती घडवायची होती तर तुम्ही मुख्यमंत्री असताना क्रांती का घडवली नाही. लोकांच्या घराला मशाल लावली. नावात उद्धव आहे. पण उद्ध्वस्त करायला मशाल लावू नये, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | दररोज 1 ग्लास किवी ज्यूसचे सेवन ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी
- Chandrashekhar Bawankule | “ठाकरेंची मशाल पंजाच्या हातात”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
- Eknath Shinde | निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ – एकनाथ शिंदे
- Narayan Rane । उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला ‘मशाल’ लावली आणि ‘उद्ध्वस्त’ केले; नारायण राणेंचा हल्लाबोल
- Health Care Tips | ‘या’ नैसर्गिक औषधी वनस्पती ठेवतील तुम्हाला मानसिक तणावापासून दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
