🕒 1 min read
मुंबई : कळवा-विटाव्यामधील सूर्यनगर भागात असणाऱ्या नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या मंडळाने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त स्थापना केलेल्या देवीच्या मूर्तीचं दसऱ्यानंतरही विसर्जन केलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या देवीच्या दर्शनाला येत नाहीत तोपर्यंत आम्ही देवीचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका नवरात्र उत्सवाच्या मंडळाने घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे जोपर्यंत आमच्या या मंडळाला भेट देत नाही तोपर्यंत दुर्गा विसर्जन करणार नाही सांगणाऱ्या या मंडळाला थेट मनसेनं इशारा दिला आहे.
या मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवीच्या दर्शनासाठी आमंत्रण देण्यात आलं होत. मात्र मुख्यमंत्री न आल्याने या मंडळाने हा निर्णय घेतला. आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या मंडळाच्या या उत्सवस्थळाला भेट देण्यासाठी आणि देवीच्या दर्शनास येण्याची विनंती केलेली आहे, परंतु कदाचित ते विसरले असावेत. आम्ही त्यांना आता पुन्हा एकदा दर्शनास येण्याची विनंती करत आहोत. ते दर्शनाला येत नाहीत तोपर्यंत आम्ही देवीच्या मूर्तीचं विसर्जन करणार नाही, असा आग्रह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.
या मंडळाने देवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं नाही अशी माहिती समोर आल्यानंतर आता मनसेनं या वादात उडी घेत थेट मंडळाला विसर्जन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री हे देवापेक्षा मोठे नाहीत असं सांगत मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मंडळाला फैलावर घेतले आहे.
हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचं अविनाश जाधव म्हणाले आहेत. मुख्यमंत्री हिंदू, हिंदूत्व म्हणतात ते खोटं आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना केला आहे. आमचं म्हणणं आहे की देवीचं विसर्जन नियमाने करा. त्याचा खेळ करु नका,” असं अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटलांचा खुलासा म्हणाले…
- Shivsena । विचारांचे सीमोल्लंघन आणि भोजनभाऊंची गर्दी!; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल
- Dasara Melava । उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य स्वित्झर्लंडमध्ये मजा करत होते; शिंदे गटाचा दावा
- Sudhir Mungantiwar | शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Shivsena । एसटी बसेस बुक करण्यासाठी 9 कोटी 99 लाख कोणी भरले?; दानवेंचा शिंदे गटाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
