Share

Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 40 आमदारांसोबत मिळून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार एकनाथ शिंदेवर टीका-टीप्पणी केली. याला शिंदेंकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आलं होतं. मात्र शिंदेंनी शिवसेनेवर दावा करत ठाकरेंच्या अडचणीत वाढ केली. त्यामुळे अनेक विषयांवर वाद चालू असून शिंदे आणि ठाकरे पुन्हा कधी एकत्र येणार का? असा सवाल अनेकांच्या मनात होता. याचं उत्तर आता शिंदेंनी दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीयाः

आज आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत, तिथं बाळासाहेबांचे विचार आहेत, राज्याचा सर्वांगीण विकास याकडे आमचं लक्ष आहे, जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केली आहे. ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथं लोकांच्या चेहऱ्यावर वेगळं पाहायला मिळत आहे, याचा अर्थ त्यांनी सरकारला मान्यता दिली आहे. लहान मुलं राजकारणाशी संबंध नसणारी, तुमचं पाऊल राज्याच्या हिताचा आहे, असं सांगतात त्यामुळे टीका करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर देऊ हा माझा स्वभाव आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

… म्हणून बंड करण्याचा निर्णय झालाः

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करणं आम्हाला आधीपासून मान्य नव्हतं, सेनेच्या आमदारांनाही मान्य नव्हतं, जनतेला ही मान्य नव्हतं, आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे नेतृत्वाचा निर्णय झाला आणि आम्ही एकत्र काम करू लागलो. मात्र, तेव्हाही आमदारांची याला मान्यता नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जो उमेद्वार पराभूत झाला त्याला हाताशी धरून सर्व सुरू होतं, शिवसेनेची गळचेपी होत होती, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार यांचीही सरमिळसळ होत होती, यातूनच बंडखोरीचा निर्णय झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्याः 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!