Share

Aditya Thackeray : “बरं झाली घाण गेली…” ; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्थिरतेनंतर सध्या राजकीय रणकंदन माजले आहे. शिवसेना आपली ताकद दाखवण्यात व्यस्त आहेत. तर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेतेही शक्तिप्रदर्शन करत आहेत. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपली ताकद दाखवत आहेत. दरम्यान काल (शनिवार) मुंबईतील लाला कॉलेजच्या सभागृहात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी भाषणातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आदित्य ठाकरेंच्या शब्दात एकनाथ शिंदे गटाला इशारा देखील दिला आहे. विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो, लक्षात ठेवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. शनिवारी झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते, असेही ते म्हणाले. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.”

राजकीय संकटात शिवसेना पूर्ण ताकदीने बंडखोर आमदारांचा सामना करत आहे. शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले असून शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!