🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना ‘रोखठोक’ सदरातून एक प्रसंग अधोरेखित केला आहे.
शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिंदे यांना फडणवीस काळात व ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवले. या खात्याचा पसारा व आर्थिक उलाढाल मोठी आहे. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असे सांगितले जाते. त्यातून हे बंड झाले. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भारतीय जनता पक्षाबरोबर झालेला ‘अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांचेच नाव पुढे केले असते. शिंदे यांचा घात भाजपने केला. त्याच भाजपबरोबर शिंदे व त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचे आहे. हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून. स्वतः शरद पवार व सोनिया गांधी यांनी त्यांना आग्रह केला व मुख्यमंत्रीपदी बसवले, पण शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : शिंदेंचे मुख्यमंत्री पद कोणी रोखले?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल
- Sambhaji Chhatrapati : “राजदंड ही शोभेची वस्तू नसून लोकसेवेचे…”, संभाजी छत्रपतींचे ट्वीट चर्चेत
- Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chitra Wagh : “…आता रश्मी वहिनींच्या पडद्यामागून लढाई करणार”, चित्रा वाघ यांचा टोला
- Chitra Wagh : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे…”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
