🕒 2 min read
मुंबई: कोलकाताने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ५६व्या सामन्यात मुंबईचा ५२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे कोलकाताच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जाणून घ्या १० संघाचे प्लेऑफचे समीकरण काय आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सोमवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा ५२ धावांनी दणदणीत पराभव केला. कोलकाताच्या या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की खरच कोलकाता टॉप ४ मध्ये पोहोचले का? जाणून घेऊयात या हंगामातील १० संघांचे आत्तापर्यंतचे नेमके समीकरण काय आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन यशस्वी संघ या हंगामात मोठा संघर्ष करताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नईने या वर्षी १० लढतीनंतर गुणतक्त्यात अनुक्रमे १०वे आणि ९वे स्थान मिळवले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ५६ लढती झाल्या असून साखळी फेरीतील १८ लढती शिल्लक आहेत. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचून सुद्ध अद्याप एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. अर्थात काही संघांचे चित्र स्पष्ट आहे. पण क्रिकेटमध्ये शेवटच्या लढतीपर्यंत काहीही होऊ शकते.
१) लखनऊ सुपर जायंट्स(Lucknow Super Giants)-
#SuperGiants hitting the sweet spot and gearing up for #LSGvGT in style ????????#AbApniBaariHai????#IPL2022 ???? #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/GHgtFV5Ind
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 10, 2022
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊचा संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. लखनऊने ८ विजयांसह १६ गुण मिळवले असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जाते. पण राहुलच्या संघाचा प्रयत्न असेल की साखळी लढतीत आणखी काही सामने जिंकण्याचा, जेणेकरून संघ टॉप २ मध्ये स्थान मिळवेल आणि फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील. लखनऊचे नेट रनरेट प्लस ०.७०३ इतके आहे. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १० मे- गुजरात, १५ मे- राजस्थान, १८ मे- कोलकाता यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
२) गुजरात टायटन्स(Gujarat Titans)-
Pune mein ek aakhri baar! #LSGvGT
Let's ???????????????? this one for the memories ????#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/6jRyZ1J9kk
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022
लखनौ प्रमाणेच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातचे १६ गुण झाले आहेत आणि त्यांचे देखील प्लेऑफमधील स्थान निश्चित आहे. हा संघ पहिल्या दोन स्थानासाठी प्रयत्न करेल. गुजरातने ११ पैकी ८ लढती विजय मिळवला आहे. त्यांचे नेट रनरेट प्लस ०.१२० इतके आहे. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १० मे- लखनऊ, १५ मे- चेन्नई, १८ मे- बंगळुरू यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
३) राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals)-
You're never alone in the #RoyalsFamily. ????#DreamBig | #दिलसेरॉयल | @Dream11 | @IamSanjuSamson | @KumarSanga2 pic.twitter.com/FADzhhWbXI
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 10, 2022
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान एक मॅच जिंकावी लागले. आता त्यांचे ११ पैकी ७ विजयासह १४ गुण झाले आहेत. राजस्थानचे नेट रनरेट प्लस ०.३२६ इतके आहे. त्यांना शिल्लक लढतींमध्ये ११ मे- दिल्ली, १५ मे- लखनऊ, २० मे- चेन्नई यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
४) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(Royal Challengers Bangalore)-
Can you guess which of our stars is poised to launch one out of the park here, 12th Man Army? ????☄️ #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #GuessThePlayer pic.twitter.com/dE52RO3zdc
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 10, 2022
बेंगळुरूने पराभवानंतर कमबॅक केले आहे. पण त्यांचे नेट रनरेट वजा (-०.११५) आहे. १२ लढतीत ७ विजयासह आरसीबीचे १४ गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रनरेट चांगले करावे लागले आणि किमान एक विजय तरी मिळवावा लागेल. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १३ मे- पंजाब, १९ मे- गुजरात यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
५) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)-
Our faith in YOU is absolute ????????
We B.E.L.I.E.V.E ???? pic.twitter.com/ho3lC8xNMV
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 10, 2022
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यात जमा आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. दिल्लीने ११ पैकी फक्त ५ लढती जिंकल्या आहेत आणि त्यांचे नेट रनरेट प्लस ०.१५० इतके आहे. त्यांना शिल्लक लढतींमध्ये ११ मे- राजस्थान, १६ मे- पंजाब, २१ मे- मुंबई यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
६)सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad)
Striking p̶o̶s̶e̶s̶ cameras. ????@IamAbhiSharma4 | #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/92dzJigQHO
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 10, 2022
केन विलियमनसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादला बंगळुरूविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. मोठ्या पराभवानंतर त्यांचे नेट रनरेट देखील वजा (-०.०३१ ) झाले आहे. आता शिल्लक ३ लढती जिंकल्या तर प्लेऑफचे तिकीट मिळू शकते. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १४ मे- कोलकाता, १७ मे-मुंबई, २२ मे- पंजाब यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
७)पंजाब किंग्ज (Punjab Kings)-
Yaar 4️⃣ te saare dildaar ????#SherSquad, who do you think the joke is about❓️????#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @KagisoRabada25 @jiteshsharma_ @SDhawan25 @arshdeepsinghh pic.twitter.com/5S21nMkift
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 10, 2022
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबला शनिवारी हंगामातील सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे नेट रनरेट देखील वजा झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना उर्वरित सर्व लढती फक्त जिंकाव्या लागणार नाहीत तर रनरेट देखील चांगले करावे लागले. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १३ मे- बंगळुरू, १६ मे- दिल्ली, २२ मे- हैदराबाद यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
८)चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)-
"Chal Bhaijaan, Selfie Le Le Re!"#WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/yzF4qDCBEX
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 10, 2022
धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शिल्लक ३ लढती मोठ्या अंतराने जिंकाव्या लागतील. त्याचे ८ गुण असून दुसऱ्या बाजूला ४ असे संघ आहेत ज्यांचे १४ पेक्षा अधिक गुण आहेत. त्यामुळे नेट रनरेट चांगले असेल तर चेन्नईला संधी मिळेल. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १२ मे- मुंबई, १५ मे- गुजरात, २० मे- राजस्थान यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
९)कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)
2 crucial points on board after a comprehensive win against Mumbai!
Read more ⤵️ #AmiKKR #MIvKKR #IPL2022 https://t.co/ZE45zVJhLc
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 9, 2022
केकेआरची अवस्था हि तळ्यात मळ्यात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा १२ पैकी ७ सामन्यात पराभव झालाय. नेट रनरेट तर वजा आहेच त्यामुळे एखादा चमत्कार त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १४ मे- हैदराबाद, २८ मे- लखनऊ यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
१०)मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)-
Some good individual performances in a tough loss.
Vote for your @UshaPlay Paltan's Player of the Match.
DM "MIvKKR" or click the link below to ???????????????? ????????????⬇️ https://t.co/PmPFRR5Twn#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #TATAIPL #MIvKKR @UshaIntl pic.twitter.com/f0bdQuD0gs
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या हंगामात सर्वात आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला मुंबईचा संघ सध्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय. शिल्लक राहिलेल्या दोन लढती जिंकून मुंबई चांगला शेवट करण्याचा प्रयत्न करेल. त्यांना शिल्लक लढतींमध्ये १२ मे- चेन्नई, २१ मे- दिल्ली यांच्याशी सामने खेळायचे आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
