🕒 1 min read
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप मविआ सरकारने केला आहे. तर सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने इफ्तार पार्ट्यांमध्ये अनेकजण सहभागी होत आहे. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या सहभागावरुन भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी ठाकरे सरकारवर (thackeray government) अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. रझा अकादमी तीच आहे, ज्यांनी आझाद मैदानावरील अमर जवान स्तंभाची तोडफोड केली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याच अकादमीने भिवंडीत मोर्चा काढल्यानंतर २ पोलीस त्यात मारले गेले होते. नुकतेच, अमरावती, नांदेड, मालेगाव येथे जे मोर्चे काढण्यात आले, तेथेही पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली होती. जर, अशा रझा अकादमीसोबत पोलीस आयुक्त दिसत असतील तर कसं?, असा सवाल नितेश राणे यांनी ट्वीट करत केला आहे.
— Nitesh Rane (@NiteshNRane) April 18, 2022
“ज्या रझा अकादमीने आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?”, असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेना आणि अयोध्याचं राजकीय नाही तर भावनिक नातं आहे”- संजय राऊत
- “शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचाय” ; गोपिचंद पडळकरांचा हल्लाबोल
- “…म्हणून पवार साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान”, रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले
- “सत्ता गेल्याने पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न”, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
- “…यावर पवार कुटुंबीयांनी सखोल चिंतन करावं”, रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सदाभाऊंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
