🕒 1 min read
पुणे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे शहरातील विविध विकासकामांचे अनावरण आणि उदघाटन करायला मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. यात पुणे महानगरपालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण, १५० इलेकट्रीक बस सेवेचे उदघाटन, पुणे मेट्रोचे उदघाटन, पुणे नदी सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन अश्या काही कार्यक्रमांचा समावेश आहे.
मात्र नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याला, शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. पुणे शहर काँग्रेसतर्फे शहरातील खंडूजी बाबा चौकात आंदोलन करण्यात येत आहे, तर राष्ट्रवादी काँगेसतर्फे कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. ” नरेंद्र मोदी यांनी संसदेत महराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांमुळे देशभरात कोरोना वाढला या प्रकारचे वक्तव्य केले होते. तसेच मोदींना आज सभेत फेटा घालण्यात येणार आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे. आमचा फेट्याला विरोध नाही पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा फेट्यावर का ?” असे मुद्दे उपस्थित करत पुणे शहर काँग्रेसच्या वतीने पुण्यातील खंडूजी बाबा चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे.
तर कॅम्प परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोदींच्या पुणे दौऱ्या विरुद्ध आंदोलन करत आहे. “पुणे मेट्रोचा प्रकल्प हा एकूण ३१ किलोमीटर पेक्षा जास्त आहे. परंतु यापैकी फक्त ५ किलोमीटरचेच काम झाले असून , या अर्धवट पुणे मेट्रोच्या उदघाटनाला देशाच्या प्रधानमंत्र्याना बोलवायची काय गरज आहे ?” असा प्रश्न उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास फेट्याने होणार सन्मान
- पंतप्रधान मोदींचा आज पुणे दौरा; मेट्रो उद्घाटनासह अनेक कार्यक्रमांना उपस्थिती
- शरद पवारांच्या टीकेवर नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही आयुष्यभर हेच…”
- “सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंचा मला दोनदा फोन आला”, नारायण राणेंचा दावा
- Disha Salian Case : नऊ तासांच्या चौकशीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी अमित शहांना फोन केला आणि…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
