Share

PM Modi Pune Tour : सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य; नेमके कारण काय?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (६ मार्च) पुणे दौऱ्यावर येणार असून यावेळी त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासह पंतप्रधान मोदी आज अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य ठरवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एमआय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य ठरवण्यात आला असून ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल त्यांना तो काढण्यास सांगण्यात येत आहे. तसेच ज्यांनी शर्टच्या आतमधे काळ्या रंगाची बनियान आणि पायात काळ्या रंगाचे मोजे घातले असतील त्यांनाही ते काढण्यास सांगण्यात आले आहे. फक्त इतकेच नाही तर काळ्या रंगाचा मास्कही काढून टाकण्यास सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या सभेत काळ्या रंगाचा उपयोग करून कोणी निषेध करु नये यासाठी हे करण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ताफा पुण्यातील ज्या ज्या रस्त्यांवरून जाणार आहेत त्या प्रत्येक रस्त्याला बॅरिकेडींग करण्यात आले आहे. तसेच सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!