सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे. हे सूक्ष्म चित्र साकारायला भिंगाचा वापर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळाच्या दाण्यावर चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
