🕒 1 min read
बंगळुरू : ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बेंगळुरू येथे होत असलेल्या IPL 2022 च्या ऑक्शनच्या पहिल्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सला ६.२५ कोटी रुपयांना विकला गेला आहे. वॉर्नरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मुंबई इंडियन्सनेही वॉर्नरला घेण्यासाठी प्रयत्न केले मात्र दिल्लीने बाजी मारली.
वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा खेळाडू आहे. २००९ मध्ये वॉर्नरने दिल्ली डेअरडेव्हिल्ससह पर्दापण केले होते. त्याने दिल्लीसह पाच हंगाम खेळले आणि २०१४ च्या ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ५.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तसेच त्याने संघाचे नेतृत्व देखील केले. २०१६ मध्ये त्याने संघाचे नेतृत्व करून पहिले जेतेपद मिळवले. त्याच हंगामात वॉर्नरने ८४८ धावा करत आघाडीवर स्पर्धा संपवली.
२०२१ मध्ये मात्र वॉर्नरची संघासोबत परिस्थितीने आणखी वाईट वळण घेतले कारण संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याला हंगामाच्या मध्यभागी कर्णधारपद सोडावे लागले आणि त्यानंतर व्यवस्थापनाशी कथित भांडणामुळे त्याला उर्वरित स्पर्धेसाठीही संघातून वगळण्यात आले. मात्र वॉर्नरची आता दिल्लीत परतवारी होणार आहे. दिल्ली काही काळ वॉर्नरकडे कर्णधार म्हणून बघू शकते.
महत्वाच्या बातम्या
- IPL Auction 2022 : श्रेया मोठा गेम झाला यार..! RCB म्हणता म्हणता अय्यर गेला ‘या’ संघात; मिळाले १२.२५ कोटी!
- IPL 2022 Auction : चेन्नईचा फाफ डुप्लेसिस खेळणार बंगलोर कडून; मागील वर्षी ठरला होता सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू
- suspension of 12 mla revoked : “महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
- IPL 2022 Auction: कागिसो रबाडा खेळणार पंजाबकडून; लागली इतकी बोली
- IPL 2022 AUCTION: IPL 2022 AUCTION : अर्रर्र..! ज्या संघासोबत झाला वाद, आता त्याच संघाचा अश्विन झाला भाग!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
