🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील एका इमारतीत अग्नी तांडव बघायला मिळाला आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज(२२ जाने.)सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
#UPDATE | Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 22, 2022
ही आग नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला लागली असून या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर बाकी जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याचे बघायला मिळत असून ही आग कशी लागली यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- उत्पल पर्रिकर यांची वेदना मी समजून घेऊ शकतो- संजय राऊत
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू”, भाजपच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
