🕒 1 min read
मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘महाभारत’चे अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी तब्बल १२ वर्षांनंतर पत्नी स्मितापासून (wife Smita) विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का विभक्त झालो, याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. मी एवढेच सांगू शकतो की घटस्फोट मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक असतो. असे व्यक्त केले आहे.
दरम्यान सप्टेंबर २०१९ मध्येच या जोडप्याचे नाते तुटले होते. स्मिता या पेशाने आयएएस अधिकारी (IAS officer) असून दोन जुळ्या मुली आहेत. त्या इंदूरमध्ये आई स्मितासोबत राहतात. नितीश भारद्वाज यांनी एका मुलाखतीत पत्नी स्मितापासून विभक्त झाल्यासंदर्भात खुलासा केला. नितीश भारद्वाज यांचे पत्नीसोबतचे १२ वर्षांचे नाते तुटले, त्याबद्ल बोलताना नितीश भारद्वाज म्हणाले, होय, मी सप्टेंबर २०१९ मध्ये फॅमिली कोर्टात (family court) घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आम्ही का विभक्त झालो, याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही.

तसेच लग्नाच्या नात्यासंदर्भात बोलताना भारद्वाज म्हणाले, ‘लग्नसंस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. पण त्याबाबतीत मी कमनशिबी ठरलो. लग्न अयशस्वी ठरण्याची अनेक कारणं असू शकतात, अनेक वेळा आपण आपल्या साथिदारच्या अॅटिट्यूडसोबत कॉम्प्रमाइज करू शकत नसता, तर कधी कम्पॅशनची कमतरता असते. कधी कधी ईगो अडवा येतो. तर कधी आपले विचार मॅच होत नाहीत. पण नाते तुटल्यानंतर सर्वाधिक त्रास मुलांना होतो. यामुळे, मुलांवर वाईट परिणाम होतो आणि या केवळ पालकच जबाबदार असतात.
या नात्यासंदर्भात जेव्हा स्मिता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्यांनी कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. भारद्वाज यांचा भावनिक खुलासा तसेच पोस्ट वाचून सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
पटोले म्हणतात, मोदी नावाच्या गावगुंडाला पकडले, पोलिस म्हणतात कोणालाही अटक नाही…
-
औरंगाबाद जिल्ह्यात पोकरा योजना; ३२७ गावांसाठी १३० कोटींचा आराखडा!
-
आता चिरंजीवी यांची मुलगी श्रीजी घेणार घटस्फोट? जाणून घ्या नेमकं प्रकरण
-
“हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
