🕒 1 min read
ठाणे: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात वाद सुरु आहे. खारेगाव पट्ट्यात ठाणे महापालिकेने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात या वादाची सुरुवात झाली. कळवा खारेगांव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
दिवा येथील एमएमआरडीएच्या (MMRDA) घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. यावेळी बोलताना त्यांनी महापौर नरेश म्हसके (Naresh Mhaske) यांच्यावर टीका करत फटकारले आहे.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या फेसबुक पोस्टवरुन आव्हाडांनी नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? अशी विचारणा केली आह. जे एकनिष्ठेबद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे (Narayan Rane) कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले, क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आले, या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावले आहेत.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करणं, उद्धव ठाकरेंना कार्यकर्ता तुटू देऊ नका समजावून सांगणं, त्यानंतर मी कार्यरत होणं, नजीबने त्यांना लपलेल्या स्थितीतील बाहेर आणणं, क्षणभर विश्रांतीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर उभं करणं आणि त्यांनी त्यांना माफ करणं याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. निष्ठा वैगेरे मला शिकवू नका, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“राणेंना रातोरात अटक करणारे पोलीस आता गप्प का? मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच…”, फडणवीसांचा हल्लाबोल
-
“नाना पुण्यात कधी येताय?आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक”, फ्लेक्सबाजी करत भाजपचे आव्हान
-
‘आता मुख्यमंत्री कुठे पळाले?’; नाना पटोले प्रकरणी सोमय्यांची टीका
-
“इतकं खोटं टेलिप्रॉम्प्टरही सहन करू शकलं नाही”, राहुल गांधींचे टीकास्त्र
-
औरंगाबादेत करुणा मुंडेंच्या शिवशक्ती सेनेला नाकारली परवानगी; नेमके काय आहे कारण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
