🕒 1 min read
मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ हा चित्रपट (film ‘Pushpa’) प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. हिंदी व्हर्जनमध्ये (Hindi voice) अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने (Actor Shreyas Talpade) आवाज दिला आहे. अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत आभार मानले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान सोशल मीडियावर (social media) दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ स्वत: श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “श्रेयसजी चित्रपटासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार” असे अल्लू अर्जुन बोलताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CYvRi7cI6DM/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता श्रेयस तळपदे याने हा व्हिडीओ शेअर करत ‘अल्लू अर्जुन तुझे खरच मनापासून आभार. तसेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी (Hindi version) माझा आवाज योग्य आहे असा विचार केल्याबद्दल मनीष शाह (Manish Shah) तुमचेदेखील आभार. माझ्या आवाजातील सुधारण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंड डायरेक्टर अब्दुल तुमचेही मनापासून धन्यवाद’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. श्रेयशच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडे अशा अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन तसेच मराठमोळ्या श्रेयसच्या चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
घटस्फोट धनुष आणि ऐश्वर्याचा, चर्चा मात्र श्रुती हसनची; जाणून घ्या काय आहे प्रकरण
-
अतुल भातखळकरांच्या अटकेवरून चंद्रकांत पाटलांनी दिला ठाकरे सरकारला इशारा; म्हणाले..
-
केजरीवालांची पंजाबसाठी मोठी घोषणा; मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव केले जाहीर
-
अजून वेळ गेलेली नाही; माघारी फिरा, गुणरत्न सदावर्तेंचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
