🕒 1 min read
औरंगाबाद: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी वैजापूर शहरातील पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. वैजापूर येथील वसंत क्लबमध्ये येत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. मात्र बैठकीत झालेल्या कुरबुरीनंतर प्रकरण थेट एकमेकांच्या अंगावर खुर्ची फेकून मारण्यापर्यंत पोहोचले. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम यांनी शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे(Ramesh Bornare) यांच्यावर थेट खुर्ची फेकून मारल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वैजापूर येथील वसंत क्लबमध्ये शिवसेनेची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच बैठकीत शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे. बैठकीमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम यांनी काही पदाधिकाऱ्यांना बाबत तक्रारी केल्या. पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावत नाही. विश्वासात घेत नाही. तालुक्यातील परिस्थिती बिकट आहे. हेवेदावे वाढल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अंबादास दानवे यांच्याकडेच त्यांनी तक्रार केली. मात्र त्यानंतर लगेचच वादाला सुरुवात झाली. वैजापूरीतील दोन गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. निकम व बोरनारे गट एकमेकांवर चालून आले. आणि प्रत्यक्ष हाणामारीला सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढतच गेला. आ. दानवे त्यांच्याकडून याबाबत आतापर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
-
औरंगाबादेत अॅण्टिजेन, आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या १५ खासगी प्रयोग शाळांना नोटिसा!
-
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू

