पुणे : होऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच इच्छुकांचे नावे मागवल्याने काँग्रेस स्वबळावर लढण्याचे चिन्हे दिसत असून या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रतिष्ठा पणाला लावणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना डावलल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. आता अखेरपर्यंत हा स्वबळाचा नारा कायम राहणार की आचार संहिता लागू झाल्यावर काँग्रेस महाविकास आघाडीत सामील होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना पत्र पाठवून आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग आणि वॉर्ड यामधील जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवावी असे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे या पत्रात या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यापूर्वी अशा पध्दतीने पुण्यातील काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे इच्छुक उमेदवारांची यादी दिली नव्हती आणि प्रदेशने अशी यादी मागविली नव्हती. ही सर्व प्रक्रिया स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या पातळीवर पार पडली जात होती. आता मात्र प्रदेशने ही यादी मागविल्याने यापुढे काय होणार? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातच अद्याप प्रभाग रचना जाहीर झालेली नाही, आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- विधानसभा निवडणुकींचे निर्बंध लागू होण्यापूर्वीच भाजपने घेतल्या ३९९ प्रचार सभा
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
