🕒 1 min read
मुंबई : धर्म संसदेत साधु संतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,’हा सर्व प्रकार म्हणजे एकप्रकारचे गृहयुद्ध आहे. २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशा प्रकारे संपवण्याची गोष्ट करू शकत नाही.’
तसेच पुढे ते म्हणाले की,’मुघलांविषयी सतत बोलले जाते. मात्र मुघलांचे खूप योगदान आहे, ही बाब ते लोक विसरतात. मुघलांनी इथे स्मारकं, संस्कृती, नृत्य, शायरी, चित्रकला, साहित्य यांसोबतच अनेक गोष्टी दिल्या आहेत. इथे निवास करण्यासाठी ते आले होते. आपण त्यांना निर्वासित म्हणू शकतो. होय, ते निर्वासितांप्रमाणेच होते’, असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.
अगदी खरंय, मुघल राष्ट्र निर्मातेच होते, त्यांनीच रचलेल्या पायावर इथे पाकिस्तान आणि बांग्लादेशची निर्मिती झाली . उर्वरित भारतातही नसिरुद्दीन सारख्या अवलादी शिल्लक आहेत. https://t.co/4xxgIc53p0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 30, 2021
दरम्यान, नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’अगदी खरंय, मुघल राष्ट्र निर्मातेच होते, त्यांनीच रचलेल्या पायावर इथे पाकिस्तान आणि बांग्लादेशची निर्मिती झाली . उर्वरित भारतातही नसीरुद्दीन सारख्या अवलादी शिल्लक आहेत’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
