Share

नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू (Archbishop Desmond Tutu) यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. टूटू यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आर्कबिशप एमेरिटस डेसमंड टुटू हे जगभरातील असंख्य लोकांसाठी मार्गदर्शक होते. मानवी समानतेवर त्यांनी दिलेला भर कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आर्चबिशप डेसमंड टूटू यांना देशाचा ‘Moral Compass’ म्हणून ओळखले जात होते. जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे डेसमंड टूटू हे समकालीन होते.वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता. र्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच १९७० च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या विरोधकांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने जगभर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!