Share

प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली असून याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांची यांनी धमकी देणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येत असून बीड जिल्ह्यातील भाविकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन केले आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

ट्विटमध्ये मुंडे म्हणाले आहेत की,’श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित अ‌ॅक्शन घेत आहे.’

दरम्यान, ‘कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. ५० लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील’, असेही मुंडे म्हणाले आहेत. तसेच परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!