🕒 1 min read
मुंबई : ‘मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले हे लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत’, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी ट्वीट करत केला आहे. फक्त एवढेच नाही तर या संशयितांचे फोटो देखील मलिकांनी ट्विट केले आहेत.
ट्विटमध्ये मलिक म्हणाले आहेत की,’या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.’
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
दरम्यान, मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले असून यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत असून त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. परंतु, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘नागपूर विधानपरिषदेत बिनविरोधसाठीची प्रस्ताव आला असता तर..!’
- ‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
