🕒 1 min read
वसई : चोर समजून पोलिसांनी वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आद्यपपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या महिलांना तेथील काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात बसवून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दांडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला असल्याचे आदिवासी महिला सांगत आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसई येथे आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी केलेल्या मारहाण घटनेसंदर्भात आज दुपारी २:३० वाजता डिसीपी कार्यालय वसई(प.)येथे पोहोचत आहे@BJP4Maharashtra @BJP4VasaiVirar @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 26, 2021
यानंतर आता चित्रा वाघ या घटनेला विरोध करत स्वत: आज दुपारी २:३० वाजता डिसीपी कार्यालय वसई(प.)येथे पोहचणार असल्याची माहिती दिली आहे. या आदिवासी महिलांची काहाही चूक नसताना त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली ते चुकीचे असल्याचे म्हणत चित्रा वाघ वसईमध्ये दाखल होत आहे. तसेच त्या या संपूर्ण प्रकारणाची माहिती घेणार आहेत. दरम्यान, संबंधित पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं, असे देखील ट्विट करत चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम आज संपणार
- जे वकील भडकवताय, ते कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत; राऊतांचा सदावर्तेंना टोला
- फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं
- भावना गवळींना ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात हजर राहणार?
- या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं; संजय राऊत यांनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
