🕒 1 min read
मुंबई: मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत.
आजच्या या घटनेदिवशी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Minister Yashomati Thakur)यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा ताकदीने उभ्या राहणाऱ्या मुंबईकरांना आणि भारतीयांना सलाम. नागरिकांचे आणि मायभूमीचे रक्षण करताना या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना आणि नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
भारतावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावणाऱ्या आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा ताकदीने उभ्या राहणाऱ्या मुंबईकरांना आणि भारतीयांना सलाम. नागरिकांचे आणि मायभूमीचे रक्षण करताना या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना आणि नागरिकांना विनम्र श्रद्धांजली.#MumbaiTerrorAttack pic.twitter.com/RFUeOm5BOV
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 26, 2021
दरम्यान याचपार्श्वभूमीवर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. ‘आंतराष्ट्रीय समाज देखील हेच मानतो, की हा हल्ला केवळ भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील अशाप्रकारे हल्ले होत आहेत. हा हल्ला मानवतेवर तसेच संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना मिळून या विरोधात लढावं लागेल. माझा विश्वास आहे, की यामुळे मानवता जिंकेल, आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही. याप्रसंगी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो, असे म्हणत त्यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘रस्त्यांची देखभाल येत नसेल तर इंजिनीयर्सनी राजीनामा द्यावा’, केरळ हायकोर्टाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
- 26/11 चा हल्ला हा केवळ मुंबईवर नाही, तर…; फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया
- ‘जो चुप रहेगी ज़बान-ए-ख़ंजर…’, न्यायालयाने फटकारल्यानंतर मलिकांचे ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
