🕒 1 min read
बाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (Indonesia Open Badminton )भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू,(P. V. sindhu) अनुभवी बी. साईप्रणीत (b. Saipraneet)आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी(attviksairaj Rankireddy)-चिराग शेट्टी(Chirag Shetty) यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जर्मनीच्या योन ली हिला २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.
आता पुढील फेरीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्याशी सामना होणार आहे. तर पुरुष एकेरीत साईप्रणीतने बल्गेरियाच्या ख्रिस्टो पोपोव्हवर २१-१७, १४-२१, २१-१९ असा विजय मिळविला.आता साईप्रणीतची पुढील फेरीत किदम्बी श्रीकांत किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसनशीसामना होऊ शकतो.
दरम्यान पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या कँग मिन्युक आणि सिओ सँगल यांना २१-१५, १९-२१, २३-२१ असे नमवले. आता त्यांचा नूर इजुद्दीन आणि गोह से फेई या मलेशियन जोडीसोबत सामना होईल.
महत्वाच्या बातम्या:
- कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा कॅनडावर १३-१ ने विजय
- भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : भारताची समाधानकारक धावसंख्या
- शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर
- जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!
- बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
