औरंगाबाद : क्रांती चौक येथील सर्वे नं. ७७ मधील वक्फ जमीनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळविणाऱ्यांच्या ताब्यातुन वक्फ मालमत्ता सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतरांविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच तार कंपाऊंड तोडल्या प्रकरणी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे खा. इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संजय मुरलीधर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन दिनांक २०१६ मध्ये कलम १४१, १४३, १४७, १४९, ४२७ भादवी सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु असतांना सोमवारी न्यायधिक्ष पी.आर. शिंदे यांच्या खंडपीठाने न्यायनिवाडा देतांना सबळ पुराव्याअभावी खासदार इम्तियाज जलील, अरुण बोर्डे, अब्दुल रहिम नाईकवाडे, आरेफ हुसैनी, फिरोज खान, गंगाधर ढगे, अश्पाक कुरेशी व इतर यांची निर्दोष मुक्तता केली. क्रांती चौक येथील वक्फ जमीनीवर नामे हरप्रीतसिंग व्यक्तीने बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याची तक्रार खासदार इम्तियाज जलील यांना त्यावेळी प्राप्त झाली होती.
त्या अनुषंगाने जलील यांनी संबंधित विभागास अतिक्रमण निष्कासित करुन वक्फ जमीन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला ताब्यात घेण्याची सुचना केली होती. परंतु सदरील प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने खासदार इम्तियाज जलील हे आमदार असतांना त्यांनी व एमआयएम पक्षाच्या नगरसेवक व इतरांनी घटनास्थळी जावुन सदरील मालमत्ता वक्फ मंडळाच्या ताब्यात दिली होती.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने नामे हरप्रीतसिंग व्यक्तीवर क्रांतीचौक येथील ज्युबली पान सेंटर शेजारील वक्फ जमीन बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मोक्यावरील सर्व सामान जप्त केले होते. जलील यांच्यातर्फे अॅड. आदिल बियाबानी यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. शेख अल्तमश अब्दुल लतीफ यांनी सहकार्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फ्लाइटमध्ये देखील चष्मा..’म्हणत ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केली टिका
- सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य
- पती निकसोबत घटस्फोटच्या बातम्यासंदर्भात, प्रियांकांचा खुलासा
- ‘ही महाविकास आघाडी नसून ‘महाविनाश आघाडी’ आहे’
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
