🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधत असतांना गेल्या ६० वर्षात कधी एसटीचा सरकारमध्ये विलीनीकरण मुद्दा समोर आला नव्हता. मात्र आता विरोधकांकडून मुद्दामहून हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची, टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
आज(१५ नोव्हें.)कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा अजित पवार यांच्या हस्ते पार पडली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘एसटीचे राज्यसरकरमध्ये विलनीकरण केले तर राज्यातील सर्वच महामंडळाचे कर्मचारी अशी मागणी करतील. तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करु शकतात. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होईल,’ असे मत त्यांनी यावेळी मांडले.
दरम्यान, मागील आठवडाभरापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आज चार महिला एसटी कर्मचाऱ्यांनी आत्मदहणाचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली आहे. राज्यशासनानेही या संपाच्या विरोधात कठोर भुमिका घेत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. एसटीच्या समन्वयकांनी परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. मात्र, विलगीकरणाची मागणी मान्य न झाल्याने एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’

